नवरा-बायकोच्या भांडणात, सहा वर्षांच्या चिमरुडीवर केले वार; दुदैवी मृत्यू

टीम ई-सकाळ
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे : ज्या हातांनी सावरायचं वाढवायचं त्याच हातांनी जन्मदात्या आईने एका चिमुरडीचा बळी घेतल्याची घटना सोमवारी तावरे कॉलनी येथे घडली. 

पुणे : ज्या हातांनी सावरायचं वाढवायचं त्याच हातांनी जन्मदात्या आईने एका चिमुरडीचा बळी घेतल्याची घटना सोमवारी तावरे कॉलनी येथे घडली. उच्चशिक्षित दाम्पत्याचे आपसात भांडण झाले. मात्र, त्याची परिणीती म्हणून आईने स्वयंपाकघरात नेऊन दार बंद करून मुलीच्या दोन्ही हातांवर चाकूने वार केल्याने अतीरक्तस्त्राव झाला. त्यात सहा वर्षांच्या अक्षरा पाटीलचा मृत्यू झाला. दुपारी पाऊणच्या सुमारास ही घटना घडली.

आणखी वाचा : उदयनराजे थांबले की त्यांना थांबवले?

आणखी वाचा : राणेंचा प्रवेश केसरकरांच्या जादूमुळेच रखडला!​

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील धनुर्धारी सोसायटी येथे अमित पाटील आणि श्वेता पाटील हे दाम्पत्य राहत होते. त्यांना अक्षरा नावाची सहा वर्षाची मुलगी होती. साधारणपणे चार वर्षांपूर्वी हे तिघेही भारतात राहावयास आले. तत्पूर्वी ते अमेरिकेत राहत होते. अक्षराचा जन्म अमेरिकेतच झाला होता. त्यामुळे ती अमेरिकन नागरिक होती. अमित पाटील हे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतात. आता हे कुटुंब पुन्हा अमेरिकेत परतणार होते. त्यासाठी चेन्नईला व्हिसाच्या कामासाठी पुणे-चेन्नई असे विमानाचे तिकीट काढले होते. सोमवारी दुपारी दोन वाजताचे त्यांचे विमान होते. मात्र, श्वेता पाटील यांना अमेरिकेत जावयाचे नव्हते. म्हणून त्यांनी यांचा चुलतभाऊ संतोष पाटील याला घरी बोलावून घेतले. चुलते श्रीपती पाटील यांच्यासह तावरे कॉलनी येथील घरी ते सर्वजण गेले. श्वेता पाटील यांना घरातील सर्वजण समजून सांगत होते. मात्र, त्या कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. श्वेता यांच्या आईचे निधन दुर्धर आजाराने झाले होते. तसेच माझ्यानंतर माझ्या मुलीचे काय होणार या विचाराने मुलीचे आयुष्य संपवले, असे श्वेता यांचे म्हणणे आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून श्वेता यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत.

याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलिस करीत आहेत. पोलिसांनी श्वेता पाटील यांना ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune crime woman killed her six year old daughter arrested