
पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता लोणी काळभोर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचे अश्लील फोटो तर तिच्या मैत्रिणीच्या फोटोवर अश्लील कमेंट करून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.