पुण्यात सोमवारी सकाळपासून ग्राहकांची गर्दी काही प्रमाणात कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

मॅगी, पाणीपुरीचे साहित्य संपले
बहुतांश किराणा दुकानातून मॅगीचा साठा कालच संपून गेला. त्यामुळे अनेक जण मॅगीच्या शोधात फिरत होते. पाच दिवस सर्वकाही बंद असणार आहे, त्यामुळे सामान भरताना लोकांनी मॅगी, बिस्कीट, पाणीपुरीचे साहित्य, केकचे साहित्य खरेदी केल्याने त्याचा स्टॉक संपला असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

पुणे - गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात भाजी व किराणा सामान खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली. यात सोशल डिस्टन्सींगचा पार फज्जा उडाला होता. मात्र, सोमवारी सकाळपासून ग्राहकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा १० दिवसांचा लॉकडाउन सुरू होत आहे. पुढचे पाच दिवस सलग किराणा दुकाने, भाजी, चिकन, मटण, मद्य यासह सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. सकाळच्या वेळेत केवळ दूध विक्री सुरू राहणार आहे. पुढचे पाच दिवस खाद्यपदार्थ व भाजीचा तुटवडा होऊ नये, यासाठी तीन दिवस सामान खरेदीसाठी वेळ देण्यात आला होता. 

Video : 'पुणेकरांनो, लॉकडाउनचे नियम मोडू नका, नाहीतर...'; पोलिसांनी काय दिलाय इशारा?

लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर सर्वत्र रांगा लागल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दर लावून ग्राहकांची लूट केली. सर्वच भाज्यांचे दर ३० रुपये पाव किलोपर्यंत होते. दोन दिवसांच्या तुलनेने आज गर्दी कमी होती. गहू, तांदूळ, तेल, साखर मुबलक असले तरी काही वस्तूंचा तुटवडा होता. 

लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार; नाक मुरडत पुणे व्यापारी महासंघ राजी!

मॅगी, पाणीपुरीचे साहित्य संपले
बहुतांश किराणा दुकानातून मॅगीचा साठा कालच संपून गेला. त्यामुळे अनेक जण मॅगीच्या शोधात फिरत होते. पाच दिवस सर्वकाही बंद असणार आहे, त्यामुळे सामान भरताना लोकांनी मॅगी, बिस्कीट, पाणीपुरीचे साहित्य, केकचे साहित्य खरेदी केल्याने त्याचा स्टॉक संपला असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंधन भरण्यासाठीही गर्दी
को रोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पंप बंद राहणार असल्याने इंधन खरेदीसाठी नागरिकांची सोमवारी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती.
शासकीय वाहने, अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या बाबी आणि पासधारक व्यतिरिक्त इतर कुणालाही पेट्रोल, डिझेल किंवा गॅस मिळणार नाही, असे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात नमूद केले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पंप सुरू राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंधन खरेदीसाठी पंपांवर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. 

डिझेलची दरवाढ 
या महिन्याच्या सुरवातीपासून इंधन दरवाढ मंदावली आहे. पेट्रोलचे दर २९ जूनपासून ८६.८९ रुपयांवर स्थिर आहेत. तेव्हा डिझेल ७७.३५ रुपये प्रति लिटर होते. सध्या पेट्रोलची किंमत स्थिर असून, डिझेल मात्र ५० पैशांनी वाढले आहे. या महिन्यात सीएनजीदेखील एक रुपयांनी महागला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune the crowd of customers has been reduced to some extent since Monday morning