पुणे : सीताफळांचा हंगाम सुरू: मार्केटयार्डात पहिली आवक

पावसाळ्याच्या सुरुवातीला मार्केट यार्डात सिताफळाचा पहिला बहर सुरू होतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही यंदाच्या हंगामातील सिताफळ प्रथमच बाजारात दाखल झाले.
Custord Apple
Custord AppleSakal
Summary

पावसाळ्याच्या सुरुवातीला मार्केट यार्डात सिताफळाचा पहिला बहर सुरू होतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही यंदाच्या हंगामातील सिताफळ प्रथमच बाजारात दाखल झाले.

पुणे - पावसाळ्याच्या सुरुवातीला मार्केट यार्डात सिताफळाचा पहिला बहर सुरू होतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही यंदाच्या हंगामातील सिताफळ प्रथमच बाजारात दाखल झाले. मंगळवारी (ता. 31) मार्केटयार्डातील फळ विभागात 73 किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार 110 ते 211 रुपये भाव मिळाला.

मागील वर्षीही 31 मे 2021 रोजी मार्केट यार्डात सीताफळाची पहिली आवक झाली होती. त्यावेळी किलोस 60 ते 121 रुपये भाव मिळाला होता. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त भाव मिळाला आहे. अडते युवराज काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम बनवारी या फर्मवर आणि गणेश घुले यांच्या शारदा गजानान फर्मवर ही आवक झाली. यावर्षी दोन्ही गाळ्यांवर वडकी गावातून आवक झाली आहे.

काची यांच्या गाळ्यावर सुनील दशरथ कोलते यांच्या शेतातून, तर घुले यांच्या गाळ्यावर अमृत सादबा आंबेकर यांनी माल विक्रीस आणला होता. तो सिध्दार्थ खेडेकर यांनी खरेदी केला. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू आवक आणि सीताफळांच्या भावात वाढ होणार आहे. नागरिक आवर्जून सीताफळांची वाट पाहत असल्याची माहिती व्यापारी युवराज काची, माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

येथून होते आवक

वडकी, पुरंदर तालुका, यवत, उरळी कांचन, राजगुरूनगर, खेड भागातून आणि सातारा जिल्ह्यातून आवक होत.

यावर्षी सीताफळाला चांगली मागणी राहील. परिणामी चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मागील काही वर्षात करोनाचा फटका सीताफळ विक्रीला बसला होता. आईस्क्रीम, पल्प उद्योग, ज्युस विक्रेते आणि लग्नासाठी असलेल्या लोकांच्या मर्यादामुळे सीताफळांना मागणी नव्हती.

- युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड.

सीताफळाला प्रक्रीया उद्योगांकडून मागणी वाढली आहे. घरगुती ग्राहकांकडूनही खरेदी करण्यात येत आहे. यंदा जास्त होण्याचा अंदाज आहे. सीताफळाची लागवड इतर फळांच्या तुलनेने कमी खर्चात होते. पाणीही तुलनेने कमी लागते. त्यामुळे विविध भागातील शेतकऱ्यांकडून सीताफळाची लागवड करण्यात येत आहे.

- माऊली आंबेकर, व्यापारी, मार्केट यार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com