पुणे : शेअर बाजारात चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. चतु:शृंगी परिसरातील एका तरुणाची ४४ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.