

पुण्यात सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सेवानिवृत्त ६१ वर्षीय अधिकाऱ्याला ड्रेनेजलाइन दुरुस्तीच्या बहाण्याने तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) तपास सुरू करण्यात आला आहे.