

Cybercrime targeting senior citizens in Pune; police investigating pension certificate fraud.
sakal
पुणे : ‘पेन्शन सर्टिफिकेट’ देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी मॉडेल कॉलनीतील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारे मागील आठवड्यात कोंढवा परिसरातील एका ज्येष्ठ महिलेचीही फसवणूक झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक यांचे खाते एका राष्ट्रीयकृत बँकेत आहे. ते मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगजवळ एका सोसायटीत राहतात.