Pune Cyber Fraud : डेक्कन, कोथरूडमधील दोन महिलांची १५ लाखांची फसवणूक
Share Market Scam : पुण्यातील डेक्कन आणि कोथरूड परिसरात सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात परताव्याचे आमिष दाखवून आणि एपीके फाईलद्वारे दोन महिलांना एकूण १५ लाख रुपयांना गंडा घातला; दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल.
पुणे : सायबर चोरट्यांनी डेक्कन आणि कोथरूड परिसरातील दोन महिलांना शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत १५ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी डेक्कन आणि कोथरूड पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.