

Dahi Handi In Pune Six To Nine Tier Human Pyramids Draw Crowds As Govinda Teams Celebrate With Drums And Music
sakal
पुणे : आकाशात पावसाचे ढग, रिमझिम बरसणाऱ्या श्रावणसरी, रस्त्यांवर उसळलेली गर्दी, कानावर पडणारा ढोल-ताशांचा निनाद आणि त्यात ‘गोविंदा आला रे...’च्या जयघोषात एकावर एक थर रचत दहीहंडीच्या दिशेने झेपावणारे गोविंदा... अशा उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात पुण्याच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये शनिवारी दहीहंडीचा जल्लोष रंगला.