Pune : पुण्यातील डार्क चॉकलेटची जगभराला भुरळ

कंपनी येत्या पाच वर्षांत आपली गुंतवणूक दुप्पट करणार आहे.
कल्पेश परमार
कल्पेश परमारsakal

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड येथे तयार होणाऱ्या चाॅकलेटने जगभरातील खवय्यांना भुरळ घातली आहे. मार्स रिगले या अमेरिकन कंपनीने आता खेड येथे Galaxy Fusion या डार्क चॉकलेटचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनी येत्या पाच वर्षांत आपली गुंतवणूक दुप्पट करणार आहे.

कल्पेश परमार
Pune Cloudy Weather : पुणे शहरात ढगाळ हवामान कायम

चाॅकलेट, मिंट, च्युइंगम आणि कन्फेक्शन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या मार्स रिगलेने भारतातील आपली स्थानिक उत्पादन आणि गुंतवणूकही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून खेड (पुणे) येथील कंपनीत प्रथम Galaxy Fusion या डार्क चॉकलेटचे उत्पादन सुरू केले असून त्याची विक्री भारतीय बाजारपेठेसोबतच जगभरात केली जाणार आहे.

२०१६ मध्ये कंपनीने खेड येथील प्लांट मधून स्निकर्स या चाॅकलेटचे उत्पादन सुरू केले. त्यानंतर स्निकर्स, गॅलेक्सी, बूमर. आदी उत्पादने सुरू केली. ही सर्व उत्पादने जगभरात लोकप्रिय ठरली असून, आता डार्क चॉकलेटचे उत्पादन सुरू केले आहे.

मार्स रिगले इंडियाचे सरव्यवस्थापक कल्पेश परमार म्हणाले की, कोरोनानंतर एकूणच पॅकेज फूड इंडस्ट्रीजच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यातही चाॅकलेटची मागणी जगभरात वाढत आहे. मार्सने एकूणच भारतातील तीनही कंपन्यांमध्ये नवनवीन उत्पादने घेत त्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून येत्या तीन ते चार वर्षांत ती दुप्पट होईल. खेड येथील कंपनीचा लवकर विस्तार करण्यात येईल.

कल्पेश परमार
Pune News : इंटरनेटच्या आव्हानावरही नाटक मात करेल - मनोज बाजपेयी

डार्क चाॅकलेट आरोग्यदायी

सध्या डार्क चॉकलेट खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सारखेच कमी प्रमाण आणि ७० टक्के कोको असणाऱ्या डार्क चॉकलेट मध्ये फायबर, आर्यन, मॅग्नेशियम झिंक, पोटॅशियम, फाॅस्फरस असे आरोग्यदायी घटक असतात, अशी माहिती कंपनीचे विपणन संचालक वरुण अंधारी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com