

डेटिंग अॅपवरून ओळख झाल्यानंतर तरुणाला भेटायला बोलावून त्याचे नग्न फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले. शेवटी त्रासाला कंटाळून अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केलीय. ही घटना २४ फेब्रुवारीला घडली. सुजल सुनील मनकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.