पुणे-दौंड "डीएमयू'चे वेळापत्रक कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे - पुणे-दौंड मार्गावर सुरू झालेल्या डीएमयू सेवेचे वेळापत्रक पाचव्या दिवशी कोलमडले. डीएमयूमध्ये इंधन भरण्यासाठी डिझेल स्टेशनवर निश्‍चित वेळ नसल्याने या गाड्यांना बुधवारी उशीर झाला. त्यामुळे पुणे स्टेशनहून सकाळी साडेदहा वाजता सुटणाऱ्या गाडीपासून रात्री पावणेसात वाजता सुटणाऱ्या गाडीपर्यंतच सर्व डीएमयू उशिराने सुटल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

पुणे स्टेशनवरून दौंडसाठी सकाळी साडेदहा वाजता डीएमयू सुटते. मात्र, गाडी सोडण्यापूर्वी त्यामध्ये डिझेल भरणे आवश्‍यक होते. त्यासाठी गाडी प्लॅटफॉर्मवर किमान पाऊण तास आधी येणे अपेक्षित होते. ती गाडी सकाळी पावणेअकरा वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. त्यानंतर डिझेल भरून साडेदहाऐवजी तब्बल एक वाजून 10 मिनिटांनी ही गाडी पुणे स्टेशनवरून सुटली. ती दौंडला दुपारी सव्वादोनला पोचली. त्यानंतर ती पुण्याला दुपारी पावणेचार वाजता परत आली. वास्तविक, ही गाडी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पुन्हा दौंडसाठी सुटणार होती. परंतु ही गाडी चार वाजल्यानंतर सुटली. ती दौंडला सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी पोचली. अशा रीतीने संपूर्ण दिवसभर डीएमयूचा हा खेळखंडोबा सुरू होता.

दरम्यान, सायंकाळी पावणेसात वाजता सुटणारी पुणे-दौंड-बारामती ही डीएमयू रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सुटली. गाड्यांच्या या बदलांबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

Web Title: pune-daund dmu time table colapse