पुणे- दौंड लोहमार्गाचे चौपदरीकरण होणार कधी?

रमेश वत्रे / हितेंद्र गद्रे
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

या कामांची गरज

  • यवत ते लोणी काळभोरदरम्यान आणखी दोन स्टेशन हवेत. 
  • योग्य उंचीचे फलाट व ओव्हरब्रीजची गरज.
  • पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढवावी. डब्यांची संख्या वीसपर्यंत असावी.
  • महिलांसाठी पॅसेंजर गाड्यांमध्ये दोन डबे आरक्षित हवेत. 
  • दौंडहून सायकांळी सहा ते पहाटे चार वाजून ५० मिनिटांपर्यंत पुण्याकडे जाण्यासाठी पॅसेंजर गाडी हवी.

पुणे - दौंड लोहमार्गावर २४ तासांत ९० प्रवासी गाड्या; तर ३० मालवाहू रेल्वेगाड्या धावत असतात. रात्री या मार्गावर मोठा ताण येत असून, या लोहमार्गाचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. या मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे, मात्र अपुऱ्या प्रवासी संख्येचे कारण देत अद्याप लोकल सुरू केलेली नाही. तसेच, या मार्गावरील वाढती प्रवासी संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने आणखी सुविधा देण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकलसाठीची मागणी प्रलंबित
पुणे- दौंड या लोहमार्गावर हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस हे स्टेशन आहेत. येथून रोज सुमारे २५ हजार प्रवासी चढ- उतार करतात. या मार्गाचे ऑक्‍टोबर २०१७ मध्ये विद्युतीकरण झाले, मात्र अपुऱ्या प्रवासी संख्येचे कारण देत अद्याप लोकल सुरू केलेली नाही. योग्य उंचीचे फलाट व ओव्हरब्रीज नसणे, ही कारणे लोकल सुरू न होण्यामागील दाखवली आहेत. मात्र, सध्या पाटस व कडेठाण वगळता इतर ठिकाणी या सुविधा झालेल्या आहेत. विद्युतीकरण झाले असताना डिझेलवर धावणारी ‘डेमू’ सुरू केली आहे. या मार्गावर मेमू (मेमलाइन मल्टिपल युनिट) सुरू करण्याची मागणी आहे. यवत ते लोणी काळभोरदरम्यान आणखी दोन स्टेशन होणे गरजेचे आहे.

फुल विक्रेत्याच्या खात्यात जमा झाले 30 कोटी रुपये; अन्...

‘डेमू’ गाड्यांची संख्या अपुरी
एक्‍स्प्रेस गाड्या वगळता या मार्गावर ‘डेमू’ गाड्या फार कमी आहेत. जलद गाड्यांचा स्थानिकांना फायदा होत नसतो. पहाटे चार ते सकाळी ११ व दुपारी चार ते रात्री ११ वाजेपर्यंत  ‘डेमू’ गाड्यांची संख्या वाढविली तर प्रवासी संख्येत वाढ होऊ शकते. दौंड- पुणे मार्गावर धावणाऱ्या  ‘डेमू’ गाड्यांच्या डब्यांची संख्या ११ ते १३ इतकी आहे. या मार्गावर गाड्यांची संख्या अपुरी असल्याने उपलब्ध गाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. डब्यांची संख्या वीसपर्यंत करावी, अशी मागणी अनेकदा करूनही रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत 93 हरकती, सूचना

महिलांसाठी फक्त एक डबा
महिलांसाठी  ‘डेमू’  गाड्यांमध्ये एकच डबा आरक्षित आहे. ही संख्या आणखी एकने वाढविण्याची मागणी आहे. दुपारी १२ ते सायंकाळी पाच एवढ्या मोठ्या कालावधीत पुण्याकडे जाण्यासाठी एकही पॅसेंजर गाडी नाही. सायकांळी सहानंतर पहाटे चार वाजून ५० मिनिटांपर्यंत पुण्याकडे जाण्यासाठी ‘डेमू’ गाडी नाही. या दरम्यान पुण्याकडे जाण्यासाठी आणखी एक ‘डेमू’ गाडी हवी.

पुणे : डल्ला'बाज टोळीपासून सावधान; अशी केली जातेय हातचलाखी

स्टेशन परिसरात वाहनतळ हवा
पुणे-दौंड लोहमार्गावरील बहुतांश स्टेशनवर वाहनतळ ही प्रमुख समस्या आहे. केडगाव व उरुळी कांचन वगळता उर्वरित स्टेशन लोकवस्तीपासून दूर आहेत. तेथे प्रवाशांना आपली वाहने आणावीच लागतात. इतर स्टेशनला पार्किंगसाठी खासगी जागेचा वापर करावा लागत आहे. तसेच वाढत्या गर्दीनुसार स्टेशनच्या फलाटांना पूर्ण छत बांधण्याची गरज प्रवासी व्यक्त करीत आहेत.

पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच

घोरपडी स्टेशन परिसरातून प्रवाशांची मोठी चढ-उतार होत असते. हे स्थानक पुन्हा सुरू केल्यास मोठी सोय होणार आहे. 
 - जयप्रकाश अगरवाल, अध्यक्ष, दौंड रेल्वे प्रवासी ग्रुप

सध्या लोणावळा-पुणे लोकलसेवेला मोठा प्रतिसाद आहे. त्यापेक्षाही चांगला प्रतिसाद दौंड-लोणावळा लोकलला मिळू शकतो.
 - राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी

‘डेमू’ नको; लोकल हवी 
पुणे-दौंड लोकल सेवा सुरू करण्याची सर्वच प्रवाशांना अपेक्षा आहे. मात्र, ती सुरू केव्हा होणार? याची उत्सुकता आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी ‘डेमू’ सुरू झाल्याने थोडा आनंद आणि अधिक निराशा, अशा प्रकारच्या प्रवाशांच्या भावना आहेत. आजही ‘डेमू’ऐवजी लोकल सेवा सुरू व्हावी, अशीच प्रवाशांची मागणी आहे. लोकल सुरू झाल्यावर प्रवाशांनी व मासिक पासधारकांची संख्या निश्‍चित वाढणार आहे.  

पुणे- लोणावळा मार्गावर रेल्वे वाहतुकीचा मोठा ताण आहे. या मार्गाचा सर्व्हे झालेला आहे. मात्र, त्या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्याने चौपदरीकरणात अडथळे येत आहेत. तीच समस्या दौंड- पुणे लोहमार्गाच्या चौपदरीकरण कामात येऊ शकते.
 - दिलीप होळकर,  सचिव, दौंड रेल्वे प्रवासी ग्रुप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune daund railwayline work issue