
पुण्यात अपघाताच्या संख्येत वाढ होत चालली आहे. ट्रक, मोठ्या गाड्या भरधाव वेगात इतर वाहनांना धडकल्यानं होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. यात अनेकदा दुचाकीस्वार चिरडले जाऊन जिवीतहानीही होते. दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणांचीही संख्या वाढलीय. आता तर चक्क डीसीपींच्या गाडीलाच मद्यधुंद चालकाच्या गाडीनं धडक दिल्याची घटना घडलीय. यात डीसीपींच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय. तर मुलीला किरकोळ दुखापत झालीय. मुंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.