पुणे : मतदार नोंदणीसाठी पाच डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

भारत निवडणूक आयोगातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पाच डिसेंबरपर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे.
State Election Commission
State Election Commissionesakal

पुणे - भारत निवडणूक आयोगातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पाच डिसेंबरपर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे.

निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्यामुळे आता पुन्हा एक जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना पाच डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

State Election Commission
सराफी दुकानांमधून सोन्याचे दागिने पळविणाऱ्या महिलेस पोलिसांकडून अटक

ऑनलाइन पद्धतीनेही www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविता येणार आहे. नावाची पडताळणी किंवा त्यात दुरुस्त्याही करता येतील. मतदार यादीबाबत दावे व हरकती पाच डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असून, २० डिसेंबरपर्यंत त्या निकालात काढण्यात येतील. अंतिम यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येईल.

मतदारांनी एक नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावाची खात्री करून घ्यावी. नाव नसल्यास त्वरित नोंदवून घ्यावे; तसेच मृत व्यक्ती किंवा दुबार नावेही वगळावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com