पुणे- डॉक्टर उशिरा आल्यामुळे उपचाराविना बाळासह मातेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

‘‘राजीव गांधी रुग्णालयातील प्रकार गंभीर असून संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटिस दिली जाईल.समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’’
- अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका.

येरवडा : राजीव गांधी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बडे उशीरा आल्यामुळे गरोदरमाता शुभांगी जानकर (वय 20, रा. धानोरी ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर ‘एमआयएम’च्या गटनेत्या अश्‍विनी लांडगे यांनी डॉ. बडे यांची चौकशी करून त्यांना निलंबीत करण्याची मागणी आहे.

गांधी रुग्णालयात गुरूवारी रात्री आठला बेशुद्ध अवस्थेत असलेल्या शुभांगी यांना त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले. त्यांना वेळीच प्रथमोपचार मिळाले नाही. कारण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बडे यांची सायंकाळी पाचची ड्यूटी असताना ते रात्री आठ वाजले तरी पोचले नव्हते. त्यामुळे येथील परिचरिकांनी डॉ. बडे यांना शुभांगीची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती दिली. त्यावेळी डॉ. बडे यांनी उशीर होणार असून रुग्णाला इतर रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. असह्य पचिरिकांनी शुभांगी यांना ससून रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दरम्यान परिचारिकांनी डॉ. बडे यांच्या अनुस्थितीत सायंकाळी सहाला एका महिलेची प्रसूति केली. डॉक्टरांच्या अनुपस्थित प्रसूती करणे धोक्याचे असते. मात्र ऐनवेळी मातेला व बाळाला वाचविण्यासाठी प्रसूति करावी लागते असे येथील परिचारिकांनी सांगितले.

‘‘राजीव गांधी रुग्णालयातील प्रकार गंभीर असून संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटिस दिली जाईल.समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’’
- अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका.

‘‘राजीव गांधी रुग्णालयातील गेली अनेक महिन्यांपासून येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच शुभांगी जानकर यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.’’
- अश्‍विनी लांडगे, नगरसेविका’एमआयएम’गट नेते.

डॉ. बडे यांनी केले सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड 
वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बडे यांची ड्युटी सायंकाळी पाच ते सकाळी आठ पर्यंत होती. ते रात्री साडे नऊच्या सुमारास आले. रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे सीसीटिव्ही फुटेजमध्ये आपली चोरी पकडली जाणार या भितीने त्यांनी रात्रीच फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे.

Web Title: pune death of pregnant women yerwada doctor not present at hospital