Pune : आंदोलन करताच सेवकांच्या पगाराचा निर्णय; ठेकेदारावर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salary

Pune : आंदोलन करताच सेवकांच्या पगाराचा निर्णय; ठेकेदारावर होणार कारवाई

पुणे : महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात काम करणाऱ्या सेवकांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याच्या विरोधात आज महापालिकेत सभागृहाच्या बाहेर शेकडो सेवकांनी अांदोलन केले. याचे पडसाद मुख्यसभेत उमटल्याने त्याची त्वरित दखल घेण्यात आली. या सेवकांचे वेतन महापालिकेने करावे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करा असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ दिले. यानंतर सेवकांनी जल्लोष केला.

महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहेत. या ठिकाणी कर संकलन, विविध दाखले देण्याचे काम केले जाते. गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी काम करणाऱ्या सेवकांना ठेकेदाराने वेतन दिलेले नाही. प्रशासनाकडे पाठपुरावा केला तरीही ठेकेदाराने वेतन दिले नाही. त्यामुळे या सेवकांनी मुख्यसभा सुरू असताना सभागृहाबाहेर आंदोलन सुरू केले. त्यास मनसे गटनेते साईनाथ बाबर, वसंत मोरे, रुपाली ठोंबरे पाटील यांनी ही पाठिंबा दिला.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

वसंत मोरे यांनी हा विषयससभागृहाच्या समोर मांडला. त्यावेळी महापौर मोहोळ यांनी तातडीने या सर्वांचे वेतन देण्यात यावे. संबंधित ठेकेदाराकडून हे काम काढून घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व नव्याने निविदा प्रकिया राबवावी असे आदेश दिले.

loading image
go to top