Pune : न्यासावर गुन्हा दाखल करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
पुणे : न्यासावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : न्यासावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील आरोग्य भरतीसह विविध सरळसेवा भरतीत गोंधळ घालणाऱ्या न्यासा कम्युनिकेशन्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी आम आदमी पार्टीच्या वतीने डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

फेब्रुवारी आणि ऑक्टोबर २०२१ मधील सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क आणि ड ची भरती, लोहमार्ग पोलिस भरती आणि ग्रामविकास विभागाची जिल्हास्तरीय भरती प्रक्रिया राबविण्याचे काम न्यासा कम्युनिकेशन्स या कंपनीला देण्यात आले होते. या भरतीच्या लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला.

हेही वाचा: जुन्नर : बाजार समितीच्या निवडणुकीची प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध

राज्याच्या आरोग्य मंत्र्याना स्वतः पुढे येऊन साडे आठ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. तरीही ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या आरोग्य भरतीत गोंधळाची परंपरा कायम दिसली. आता यासंबंधी विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून, आपच्या युवा आघाडीच्या वतीने पुराव्यांच्या आधारे आरोग्य विभागाचे सचिव आणि न्यासा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर उपाध्यक्ष संदीप सोनावणे, लहु केदार, बालाजी कवडे आदी उपस्थित होते. पोलिसांना यासंबंधीचे पुरावेही देण्यात आल्याचे सोनावणे म्हणाले.

loading image
go to top