Pune : डिंभे धरणाच्या पाण्यात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

घोडेगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले
body of a woman
body of a woman sakal

फुलवडे : फुलवडे आंबेगाव गावच्या हद्दीत असलेल्या डिंभे धरणाच्या पाण्यात अंदाजे ६० ते ६५ वर्षे वय असलेल्या एका महिलेचा मृतदेह धरण्याच्या पाण्यात तरंगत असल्याचे संदीप नंदकर यांच्या निदर्शनास आले. त्याबाबतची माहिती त्यांनी फुलवडे येथील पोलीस पाटील शरदचंद्र मोहरे यांना फोनवरून दिली. त्यानुसार पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करून त्याबाबत घोडेगाव पोलिस स्टेशनला कळविले.

घोडेगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी सदर महिलेचा मृतदेह बाहेर काढला. सदर महिला पाय घसरून पाण्यात पडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. सदर महिलेचा फोटो आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दाखविण्यात आला. परंतु कोणीही तिला ओळखले नाही.

याबाबत घोडेगाव घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com