Recruitment : सरळसेवा भरती रखडणार?

ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, पोलिस, शिक्षक आणि म्हाडाची पदभरती मागील चार वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने रखडली आहे.
Recruitment
Recruitmentsakal
Updated on

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार जागांच्या भरतीची लोकप्रिय घोषणा झाली. त्यासाठी सर्वसाधारण वेळापत्रकही घोषित करण्यात आले. मात्र आजवर पोलिस आणि आरोग्य विभाग सोडता इतर कोणत्याही विभागाच्या भरतीची ना जाहिरात निघाली, ना अर्ज प्रक्रिया सुरू झाली.

चार वर्षांपासून रखडलेल्या सरळसेवा भरतीमुळे उमेदवारांमध्ये असंतोष असून, तातडीने पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी उमेदवार करत आहे.

ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, पोलिस, शिक्षक आणि म्हाडाची पदभरती मागील चार वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने रखडली आहे. कोरोना बरोबरच पदभरती प्रक्रियेतील गलथान कारभारामुळे अनेक उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

वयोमर्यादा ओलांडण्याबरोबरच भ्रष्ट कारभारामुळे उमेदवार हवालदिल झाले असून, नवे सरकारही विश्वासार्ह पाऊल उचलत नसल्याचे चित्र दिसत आहे.

सद्यःस्थिती काय?

  • पोलिस शिपाई भरती वर्ग ‘क’ आणि ‘ड’ सोडता इतर कोणत्याही पदांच्या जाहिराती आलेल्या नाहीत.

  • जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच सर्व प्रक्रिया सुरू होणे अपेक्षीत होते. मात्र अद्यापही कोणतेच अपडेट नाही.

  • ग्रामविकास विभागाचे २०१९ मधील परिक्षा शुल्काचा प्रश्न अनिर्णित

  • भरतीची जाहिरात नक्की केव्हा येणार याबद्दल उमेदवार अनभिज्ञ

भरती प्रक्रिया लांबली का?

  • कोरोनामुळे मागील दोन वर्षे भरती प्रक्रिया बंद

  • ज्या भरती प्रक्रिया पार पडल्या. त्यात भ्रष्टाचाराची प्रकरणे निघाल्यामुळे रद्द

  • निवडणूक आचारसंहितेमुळेही काही भरती प्रक्रिया लांबल्या

  • राज्य सरकारचा वेळखाऊपणा

Recruitment
G20 Pune summit : उकडीचे मोदक, पुरणपोळी अन्‌ सुरळीची वडी

जिल्हा परिषद भरती गट ‘क’ अद्ययावत संभाव्य वेळापत्रक ः

  1. बिंदू नामावली अंतिम करणे, रिक्त पदांची संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करणे, कंपनीची निवड करणे (आवश्यक असल्यास) व तदनुषंगिक सर्व कामे करणे ः ३१ जानेवारी २०२३

  2. जाहिरात ः १ ते ७ फेब्रुवारी ३०२३

  3. अर्थप्रक्रिया ः ८ ते २२ फेब्रुवारी

  4. अर्ज पडताळणी ः २३ फेब्रुवारी ते ०१ मार्च

पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे - ०२ ते ०५ मार्च

५) कार्यालयीन कामे - ६ मार्च ते ५ एप्रिल

६) प्रवेशपत्र - ६ एप्रिल ते १३ एप्रिल

७) परिक्षेचे आयोजन - १४ ते ३० एप्रिल

८) अंतिम निकाल जाहीर करणे आणि नियुक्ती आदेश - १ ते ३१ मे २०२३

(स्रोत - शासन निर्णय)

मागील चार वर्षांपासून सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली आहे. आत्ताच्या सरकारने ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली खरी, पण जमिनीवर या संबंधी कोणतीच हालचाल दिसत नाही. आम्ही उमेदवार प्रचंड आशेने भरतीची वाट पाहत असून, सरकारने तातडीने पदभरती सुरू करावी.

- शीतल जाधव, जिल्हा परिषद भरतीतील अर्जदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com