esakal | अलिबाग पोलिसांसमोर नारायण राणेंची हजेरी; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

अलिबाग पोलिसांसमोर नारायण राणेंची हजेरी; म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वी अलिबाग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मोठ्या हायव्होलटेज ड्राम्यानंतर सत्र न्यायालयानं त्यांना रात्री उशीरा जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना दोन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने राणेंना दिले होते. त्यानुसार नारायण राणे आज अलिबाग येथे हजेरी लावली.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न - वडेट्टीवार

अलिबागच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजेरी लावून बाहेर पडल्यावर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, "मी पोलिसांसमोर हजर वगैरे झालो नाही. तर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आलो आहे. पोलिसांच्या तपासाबद्दल आपण समाधानी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

दरम्यान, नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई म्हणाले, "गेल्या वेळी नारायण राणे पोलिसांसमोर का आले नाहीत? याचे कारण लेखी स्वरूपात दिले होते. पोलिसांनी नारायण राणे यांचा जबाब नोंदवला आहे. आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करत आहोत. आवाजाचे नमुने आज घेतले नाहीत. पोलिसांनी मागितल्यास आम्ही देण्यास तयार आहोत"

राणेंना अटक झाली त्याचं काय होतं कारण?

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत (२३ ऑगस्ट) महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केल्यानंतर रायगड पोलिसांकडे दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजीच्या तारखेला नारायण राणे पोलिसांसमोर हजर राहू शकले नव्हते. प्रकृती ठीक नसल्याचे सांगून वकिलांमार्फत पोलीस ठाण्यात म्हणणे मांडले होते. आज सोमवारी (ता. १३) दुसऱ्या हजेरीसाठी नारायण राणेंना पोलिसांसमोर हजेरी लावणे आवश्यक होते. त्यानुसार नारायण राणे दुपारी तीन वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजर राहिले व प्रक्रिया पूर्ण केली. यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या २०० मीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

loading image
go to top