
पुणे शहरात मंगळवारी ४ हजार ६०६ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
Coronavirus Updates: पुणे : पुणे शहरातील कोरोना संसर्गवाढीचा वेग वाढू लागला आहे. शहरात मंगळवारी (ता.२३) ६६१ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. रुग्णांचे हे प्रमाण एकूण कोरोना चाचण्यांच्या तुलनेत प्रतिशेकडा १४ टक्के इतके आहे. म्हणजेच शहरात दररोजच्या एकूण चाचण्यांत प्रतिशेकडा १४ नवे रुग्ण सापडले आहेत. नवीन रुग्णवाढीची ही स्थिती याआधी तब्बल साडेचार महिन्यांपूर्वी म्हणजेच ९ ऑक्टोबर २०२० ला निर्माण झाली होती. त्यावेळी शहरात एका दिवसात ६९७ नवे रुग्ण आढळून आले होते.
- Big Breaking: दहावी-बारावीच्या परीक्षा ‘ऑफलाइन’च!
दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी १ हजार १६८ नवे रुग्ण सापडले आहेत. याउलट ८०६ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या दररोज सातत्याने नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने दररोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या रुग्णांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय आज ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंपैकी शहरातील चार, पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे.
- पन्नाशीतल्या खासदारानं केलं १४ वर्षाच्या मुलीसोबत लग्न; पोलिसांकडून चौकशी सुरू
पुणे शहरात मंगळवारी ४ हजार ६०६ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ९ ऑक्टोबरला ४ हजार ७८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तेव्हा यापैकी ६९७ नवे रुग्ण सापडले होते. दरम्यान, शहरातील सर्वाधिक नवीन रुग्णांबरोबरच मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये २०४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २२४, नगरपालिका कार्यक्षेत्रात ६३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १६ रुग्ण सापडले आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)