Big Breaking : कोरोनाचा हाहाकार! पुण्यात एका दिवसात आढळले आजपर्यंतचे उच्चांकी कोरोना रुग्ण!

Corona-Patients
Corona-Patients
Updated on

पुणे : पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा हजाराच्या दिशेने जात असून, एकाच दिवसांत म्हणजे, बुधवारी (ता.१) पावणेनऊशे रुग्ण सापडले आहेत. तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांत असे साडेबाराशे रुग्ण आढळून आले आहेत.

एवढ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याने सर्वत्र घबराट आहे. मात्र, पुणे शहरात ५८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. याच दिवसभरात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६ हजार ४०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जो आकडा तीनशेपर्यंत असायचा तो गेल्या आठवड्यात पाचशेच्या पुढे गेला आणि त्यानंतर मात्र सातशेच्या पुढे सरकत राहिला. मात्र, बुधवारी एकाकी ८७८ रुग्ण सापडले आहेत. पुण्यात आतापर्यंत सर्वाधिक ६२२ रुग्ण सापडले होते.

मात्र, हाच आकड़ा आता हजाराच्या घरात पोचत आहे. तपासणीचा वेग वाढविण्यात आला असून, दिवसभरात ४ हजार ६८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील जवळपास दोन हजार नागरिकांचा अहवाल मिळाला आहे. त्यापैकी ८७८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

शहरात आतापर्यंत सुमारे १ लाख २० हजार नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यापैकीच्या १८ हजार १०५ जणांना कोरोना झाला होता. त्यातील ११ हजार ४० रुग्ण बरे झाले आहेत. दत्तवाडी, कोथरुड, पर्वती, वडगावशेरी, नवी पेठ, मुंढवा, कसबा पेठ, कात्रज, मित्र मंडळ चौक, भवानी पेठ, कोथरुड, कोंढवा, शिवाजीनगर, वडगाव (बु), वारजे, आदी भागातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com