पुणे जिल्ह्यात नवीन रुग्णांपेक्षा दुपटीहून अधिक कोरोनामुक्त; २५३३ जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

आज १ हजार १९७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून २ हजार ५३३ जण उपचारानंतर पुर्णपणे बरे झाले आहेत. बरे झालेल्या रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात आढळून आलेल्या नवीन रुग्णांच्या तुलनेत दुपटीहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत. आज १ हजार १९७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून २ हजार ५३३ जण उपचारानंतर पुर्णपणे बरे झाले आहेत. बरे झालेल्या रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या चोवीस तासांत ९ हजार १० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ५४९  जण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३२२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २१०, नगरपालिका क्षेत्रात ७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ४१ नवे रुग्ण सापडले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख ११ हजार ६२७ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ८० हजार ५७७ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आज अखेरपर्यंत एकूण ७ हजार ३३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३२४  जण आहेत.

Video : 'अहो सुप्रियाताई, महापालिकेत तुमचीच सत्ता होती!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 2 thousand 533 people recovered after treatment