Video : 'अहो सुप्रियाताई, महापालिकेत तुमचीच सत्ता होती!'

ज्ञानेश सावंत
Thursday, 15 October 2020

पुणे शहरात बुधवारी (ता.१४) झालेल्या पावसाने लोकवस्त्या आणि रस्त्यावर पाणी साचल्याच्या मुद्द्यावरून खासदार सुळे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला 'टार्गेट केले.

पुणे : पुणेकरांवर पावसाचे संकट ओढविले असतानाच महापौर मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात मात्र सत्तेच्या यशापयशावरून राजकारण सुरू झाले आहे.

पुणेकरांच्या घरात पाणी घुसण्याचा सुळे यांनी सत्ताधारी भाजपाला जबाबदार धरले. तर 'पुणे महापालिकेत सलग पंधरा वर्ष सुळे यांच्या पक्षाची म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. याची आठवण करून देत मोहोळांनी खासदार सुळेंचा आरोप खोडून काढला. कात्रज, धनकवडीसारख्या भागांत नेहमीच राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले. त्यांनी काहीच कामे केली नाहीत का? अशी विचारणा करायलाही महापौर मोहोळ विसरले नाहीत.

भारताला पहिला 'ऑस्कर' मिळवून देणाऱ्या कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचे निधन​

पुणे शहरात बुधवारी (ता.१४) झालेल्या पावसाने लोकवस्त्या आणि रस्त्यावर पाणी साचल्याच्या मुद्द्यावरून खासदार सुळे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला 'टार्गेट केले. त्याला महापौरांनी प्रत्युत्तर देत, महापौर मोहोळ यांनी भाजपच्या कामांची यादी जाहीर केली. मोहोळ म्हणाले, “परिस्थिती निर्माण झाल्यास पुणेकरांचे नुकसान होऊ नये, यासाठी आखलेल्या उपायांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे बुधवारी पावसाचा जोर असूनही फारसे काही नुकसान झाले नाही. पूर आटोक्यात राहावा, यासाठी नेमकी कामे केली आहेत. मात्र, तरीही अपुरी माहिती घेऊन सुळे यांनी आरोप केले आहेत.

घराचं स्वप्न पूर्ण करण्याकडं खरेदीदारांचा मोर्चा; विक्रीत झाली मोठी वाढ!

मुळात, ज्या भागाबाबत सुळे बोलल्या, त्या परिसरात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक निवडून आले आहेत. याची माहिती सुळे यांनी घ्यायला हवी. त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांचा निधी घेतला, तरी एवढ्या प्रमाणात समस्या असेल, तर तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी विकासकामे केलीच नाहीत का? उलटपक्षी भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक कामे हाती घेतली. त्यामुळे आंबिल ओढ्यालगतच्या रहिवाशांची सुरक्षितता वाढली."

"ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन संकटाचा सामना करायला हवा. अशा परिस्थितीत राजकारण करायला नको, अशा सल्लाही महापौर मोहोळ यांनी खासदार सुळे यांना दिला आहे.''

दोन पोलिस निलंबित; 'मोक्का'तील आरोपी बडतर्फ पोलिस जगतापला करत होते मदत

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political clashes between Mayor Muralidhar Mohol and NCP MP Supriya Sule after Pune flood situation