पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला साडेतीन हजारांचा आकडा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही गुरुवारी (ता. २७) रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी (ता. २८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.​

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२८) सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांनी साडेतीन हजारांचा आकडा ओलांडला आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ६११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी (ता.२७) हाच आकडा ३ हजार ७०३ इतका होता. 

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ७८१ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी ९२ रूग्ण कमी झाले आहेत. 

महत्त्वाची बातमी : मास्क नसल्यास बसणार पाचशे रुपयांचा भूर्दंड!​

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६०३, नगरपालिका क्षेत्रातील १८८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ३३ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये  पुणे शहरातील सर्वाधिक ४० रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २, जिल्हा परिषद क्षेत्रातील १५, नगरपालिका ४ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील तीन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही गुरुवारी (ता. २७) रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी (ता. २८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

कॉसमॉस बॅंक प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार मुंबईचा; इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी​

यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ६० हजार ४५५, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख २३ हजार ५९५ तर रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ३ हजार ९३७ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील १०७ रुग्णांचा समावेश आहे.

२१९३ जण कोरोनामुक्त 
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यातील २ हजार १९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ५७८, पिंपरी चिंचवडमधील २६२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २५७, नगरपालिका क्षेत्रातील ७७ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील १९ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 3611 new corona patients found on 28th August 2020