esakal | हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus-Seal

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणांना मुभा राहील.

हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील!

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हवेली तालुक्यातील 20 गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना बाहेर जाण्यास किंवा इतरांना प्रवेशास बंदी राहणार आहे.

डिजिटल सातबारा उतारे काढण्याचा उच्चांक; भूमी अभिलेख विभागाच्या नावावर नवा विक्रम​

हवेली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळतील अशा गावांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ऐवजी पूर्ण गावात ग्रामपंचायतीच्या हद्दीत कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर यांनी याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी केले. 8 जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून हे आदेश लागू राहतील. 

'महाजॉब्स' म्हणजे नव्या आवरणात जुनाच माल; वाचा कोणी केली टीका?​

कंटेनमेंट झोन :
मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती,  न-हे, न्यू कोपरे, खानापूर, शेवाळेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, वाघोली, खडकवासला, किरकटवाडी,  पिसोळी, वडाची वाडी, भिलारेवाडी, उरळी कांचन,  लोणी काळभोर, नांदेड, मांजरी खुर्द, कुंजीरवाडी कोंढवे-धावडे आणि देहू.

संबंधित पोलिस प्रमुख गावातील प्रवेशद्वार, रस्ते सील करतील. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणांना मुभा राहील.

'त्या' विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप मिळणार; धनंजय मुंडेंनी दिली गुड न्यूज!

- नागरिकांना प्रवेशास बंदी राहील. 
- प्रतिबंधित क्षेत्रातून अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती आणि वैद्यकीय अत्यावश्यक सेवांकरिता प्रवेश राहील
- पूर्व तपासणीशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश करता येणार नाही. 
- प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे आवश्यक
- प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू  अॅप डाऊनलोड करणे आवश्यक.
- 65 वर्षांवरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- बँकांची कामकाजाची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत राहील. ए.टी.एम. केंद्रे पूर्णवेळ कार्यान्वित ठेवावीत.
- प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंतच दूध, भाजीपाला, फळे व इतर जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयी सुविधा सुरु राहतील.
- एक किंवा दोन रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना सुरु राहतील.
- सोसायटीमध्ये रुग्ण आढळल्यास मायक्रो कंटेन्मेट झोन त्या सोसायटीपुरताच मर्यादित राहील. 
- रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व उद्योग व आस्थापना बंद करणेत येऊ नये. हे आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image