Pune News : पुणे जिल्ह्यातील ४ लाख जणांना आनंदाचा शिध्याचे वाटप - डॉ. सीमा होळकर

जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांची माहिती
Anandacha Shidha
Anandacha Shidhasakal

पुणे : पुणे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांपैकी आतापर्यंत ४ लाख ११ हजार ४६९ जणांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. उर्वरित १ लाख ५१ हजार ३२६ जणांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हा शिधा वाटप केला जाणार आहे.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने गौरी-गणपतीनिमित्त स्वस्त धान्य दुकानांमधून फक्त १०० रुपयांत चार वस्तूंचा समावेस असलेल्या आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात येत आहे. या चार वस्तूंमध्ये १ किलो रवा, १ किलो हरभरा दाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल आदींचा समावेश असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी गुरुवारी (ता.२१) सांगितले.

या आनंदाच्या शिध्यासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण ५ लाख ६२ हजार ७९५ जण पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत ४ लाख ११ हजार ४६९ जणांना प्रत्यक्षात वाटप करण्यात आले आहे. उर्वरित पात्र व्यक्तींना या शिधा वाटप करण्याचे काम सुरु असून, या सर्वांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे वाटप केले जाणार आहे. या शिधा वाटपाच्या वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास जवळच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. होळकर यांनी केले आहे.

पात्र व्यक्ती व प्रत्यक्ष वाटप

- आंबेगाव --- ४४ हजार १०० --- ३० हजार ८९०

- बारामती --- ८३ हजार ९५० --- ४९ हजार ३१९

- भोर --- २६ हजार ८०० --- २१ हजार ५७४

- दौंड --- ५२ हजार १०० --- ३३ हजार ३४

- हवेली --- २१ हजार ९५० --- १८ हजार ९५६

- इंदापूर --- ६७ हजार १४५ --- ४२ हजार ३५१

- जुन्नर --- ६३ हजार ७०० --- ५४ हजार ४१८

- खेड --- ५७ हजार ३५० --- ५१ हजार ३२५

- मावळ --- ३६ हजार ८५० --- २९ हजार २४९

- मुळशी --- १७ हजार ९५० --- १४ हजार ६३३

- पुरंदर --- ३७ हजार २०० --- २८ हजार ३६७

- शिरूर --- ४६ हजार १५० --- ३० हजार ५२३

- वेल्हे --- ७ हजार ५५० --- ६ हजार ८३०

- एकूण --- ५ लाख ६२ हजार ७९५ --- ४ लाख ११ हजार ४६९

Anandacha Shidha
Pune : ठाणे ,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या माळशेज रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकर मार्गी लावा प्रवाशांची मागणी

राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा या उपक्रमाच्या लाभासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण पात्र नागरिकांपैकी आजअखेरपर्यंत ४ लाखांहून अधिक नागरिकांना प्रत्यक्षात आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेले हे प्रमाण एकूण उद्दिष्टापैकी ८०.१५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र नागरिकांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत वाटप केले जाणार आहे.

- डॉ. सीमा होळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com