pavr
pavr

अजित पवार व गिरीश बापट यांच्यात रंगणार सामना  

भुकूम (पुणे) : पुणे जिल्ह्यातील भाजपची कार्यकारणी व पदाधिकारी नियुक्ती करण्यात येत आहेत. पदाधिकाऱ्यांनी गावापासून जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी बावधन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. 

पक्षाच्यावतीने पुणे जिल्ह्यात अठरा आघाड्या व सात मोर्चे यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यावेळी बापट यांनी मार्गदर्शन केले. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर व राहुल कुल, माजी आमदार शरद ढमाले, राज्य संघटक योगेश गेगावले, रवींद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरसेवक किरण दगडे, अमोल बालवडकर, जालिंदर कामठे, रंजना कुल, बापू मानकर आदी उपस्थित होते. 

राज्यामध्ये ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत असे गोगावले यांनी सांगितले. प्रत्येक गाव व बूथवर पक्षाची सत्ता राहील. राज्य सरकार करत असलेला अन्याय प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन बाळा भेगडे यांनी केले. राज्य कार्यकारणीची परवानगी घेऊन पुढील काळात पदे वाढविण्यात येतील. कार्यकर्त्यांनी करोनाच्या लाॅकडाउनपासून सुरू केलेली मदत सेवा चालू ठेवावी, असे आवहन जिल्हाध्यक्ष भेगडे यांनी केले. 

या वेळी निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेच्या निवडणूक लढविलेल्या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची, तर पुण्याचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडे युवा आघीडच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. 

तसेच, किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय थोरात (ता. आंबेगाव), इतर मागास मोर्चाच्या अध्यक्षपदी सागर भूमकर (ता. हवेली), अनुसूचित मोर्चाच्या अध्यक्ष मयूर कांबळे (ता. मुळशी), अनुसूचित जमातीच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकर काठे (ता. जुन्नर), अल्प संख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी राजूभाई शेख ( शिरूर) यांची नियुक्ती केली आहे. तसेच, शिक्षक, मच्छिमार, माजी सैनिक, आध्यात्मिक, वाहतूक, बुद्धिजीवी व प्रशिक्षण, ग्रामविकास, सोशल मिडिया, आयटी सेल विभागाच्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारणीत आठ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, आठ सचिव, कोषाअध्यक्ष व सह कोषाअध्यक्ष यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com