Corona Update : पुणे जिल्ह्यात दिवसभरात २४५ नवे कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : पुणे जिल्ह्यात दिवसभरात २४५ नवे कोरोना रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. १३) दिवसभरात २४५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याऊलट २७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील ९२ नवीन रुग्ण आहेत. जिल्ह्यातील अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

दिवसातील एकूण रुग्णांत शहरातील ९२ रुग्णासोबतच पिंपरी चिंचवडमधील ३३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १०३, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा नवे रुग्ण आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णात जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्वाधिक १०५ जण आहेत. पुणे शहरातील ९६, पिंपरी चिंचवडमधील ३९, नगरपालिका हद्दीतील २५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जण आहेत.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात २ हजार ४१ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी १ हजार ११३ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. उर्वरित ९२८ जण गृह विलगीकरणात आहेत.

loading image
go to top