दिलासादायक : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी नवीन रूग्णांपेक्षा दुपटीहून अधिक कोरोनामुक्त

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२८) दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत.
corona news
corona newsfile photo

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२८) दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) तुलनेत दुप्पटीहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ७ हजार १६६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, याउलट १६ हजार ७९२ कोरोनामुक्त झाले आहेत. (Pune District Corona Updates)

याशिवाय जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्या गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी ९ हजार ६३८ ने कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजार ९९१ झाली आहे. चार दिवसांपूर्वी हीच संख्या ९३ हजार ६४२ वर गेलो होती.जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रोज शहर व परिसरात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. शूक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

corona news
कोरोनाचे कॉफिटेबल बुक काढणे निषेधार्ह; राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ओहोटी सुरु झाल्याचे चित्र मागील चार दिवसांतील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८ हजार १३ ने कमी झाली होती. त्यात शुक्रवारी एकाच दिवसात आणखी पावणे दहा हजारांची भर पडली आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता.२८) दिवसभरात जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार ३७४ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार २६१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार २०५, नगरपालिका हद्दीत २२८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९८ नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ८ हजार २०० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ५ हजार १८१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार २८९, नगरपालिका हद्दीतील ५७८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

corona news
गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सव्वा आठ कोटींची फसवणूक

दिवसभरात जिल्ह्यात १२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी चिंचवडमधील तीन आणि नगरपालिका हद्दीतील दोन मृत्यू आहेत. दिवसभरात जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com