
कोरोनाचे कॉफिटेबल बुक काढणे निषेधार्ह; राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : कोरोनाच्या काळात बेड मिळाले नाहीत, ॲब्युलन्स, औषधे मिळाले नाहीत. हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. हा काळा इतिहास कॅफी टेबल बुकमधून मांडणार का? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात महापालिकेत आंदोलन केले. (Corporation coffee table book)
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कोरोना काळातील महापालिकेच्या कामावर २२० ते २५० पानाचे पुस्तक तयार केले जाणार आहे. यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च असून, एका पुस्तकाचा खर्च ३ हजार रुपयांपर्यंत असणार आहे. यासाठी बी पाकिट पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याविरोधात महापालिकेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा निषेध केला.
हेही वाचा: राज्यात वाहणार थंड वारे; उत्तर महाराष्ट्र, विदर्भात थंडी वाढणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे आदी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
विकासकामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, पण अशा कॉफी टेबल बुकसाठी तिजोरी ओसंडून वाहत आहे. कोरोनाच्या काळातील पुणेकरांचे हाल आपण सर्वांनीच बघितले आहेत. आत्तापर्यंत ९ हजार जणांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. पण कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या निधीचा वापर सुरू केला आहे, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.
हेही वाचा: ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल ४ फेब्रुवारीला करणार सरकारकडे सुपूर्द
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीसह पुणे शहराचा गौरवशाली इतिहास मांडणारे कॉफी टेबल बुक काढले. पण भाजप शहराचा काळा इतिहास लाखो रुपये खर्च करू मांडत असल्याची टीका दीपाली धुमाळ यांनी केली.
Web Title: Pune News Coffee Table Book Corporation Ncp Protest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..