
पुण्यात १० कोरोना मृत्यू; ७ हजार ७०८ नवे कोरोना रुग्ण
पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) दिवसभरात ७ हजार ७०८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याऊलट ५ हजार २१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू (Corona Death) झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सहा मृत्यू आहेत. नगरपालिका हद्दीत दोन आणि पिंपरी चिंचवड व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Pune District Corona Updates)
सोमवारी दिवसातील जिल्ह्यातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार ९५९ जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचमडमध्ये २ हजार ३६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १९, नगरपालिका हद्दीत २६० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १०५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार ६७, पिंपरी चिंचवडमधील १ हजार २७१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५९७, नगरपालिका हद्दीतील ९२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील १९८ जण आहेत.
हेही वाचा: शहर पोलिस दलास कोरोनाचा विळखा; 480 पोलिसांना कोरोनाने ग्रासले
सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण ६३ हजार १६९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २ हजार १९० रुग्णांवर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. उर्वरित ६० हजार ९७९ जण गृह विलगीकरणात आहेत. सोमवारी दिवसात ३२ हजार ९९९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण कोरोना चाचण्यांमध्ये पुणे शहरातील १५ हजार ६३० चाचण्यांचा समावेश आहे.
Web Title: Pune District Corona Updates Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..