पुणे जिल्हा परीषदेने वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांची अंतिम मुदत वाढवा : तुलसी भोर 

डी. के. वळसे पाटील 
सोमवार, 9 जुलै 2018

मंचर : “पुणे जिल्हा परीषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत वाढवावी.’’ अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी सचिन भोर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे केली आहे.

मंचर : “पुणे जिल्हा परीषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत वाढवावी.’’ अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी सचिन भोर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे केली आहे.

भोर म्हणाल्या, “सुधारित अवजारे, विद्युत मोटार पंप, कडबा कुट्टी, डीझेल इंजिन पंप, पेट्रोल डीझेल इंजिन पंप, पेट्रो केरोसीन इंजिन पंप, ७५ एम एम पीव्हीसी पाईप चार किलो, ९० एम एम इंची पीव्हीसी पाईप चार किलो, ७५ एम एम एचडीपीएफ पाईप ३.२ किलो, ट्रक्टर चलीत दोन फाळी सरी रिझर, सायकल कोळपे, ट्रीपल पिस्टन स्प्रे पंप, प्लस्टिक क्रेट्स, ताडपत्र्या, गांडूळ निर्मिती सहयंत्र आदी १७ वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करायची मुदत शुक्रवार (ता. १३) पर्यत होती.

तसेच कुकुट पालन योजना, सुधारित जातीचे अंडी उत्पादक कोबंड्या पुरविणे, मैत्रीण योजने अतर्गत महिला लाभार्थींना पाच शेळ्या व पैदाशी साठी एक नर, पशु पालकांना मिल्किंग मशीन या लाभार्थ्यांसाठी सोमवार (ता. १६) पर्यंत मुदत होती. महिला व बाल कल्याण विभागाच्या लाभाच्या योजनांची मुदत बुधवार (ता. २५) आहे. पण अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असल्याने लाभार्थींना ऑनलाईन सातबारा उतारा वेळेत मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. तसेच खरीप हंगामातील शेतीतील कामे सुरु आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेत अर्ज करता येत नाहीत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्याची आवश्यकता आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Council should increase the deadline for all schemes of personal benefit said Sachin Dawr