
फिर्याद देण्याच्या सहा महिन्यापूर्वी पीडित घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती तीन दिवसांनी घरी आली. घरच्यांनी तिच्याकडे याबाबत विचारणा केली असता तिने मैत्रिणीकडे गेल्याचे सांगितले.
पुणे : अल्पवयीन मुलीशी बेकायदेशीरपणे लग्न करून तिच्यावर बलात्कार प्रकरणात पीडित मुलगी आणि फिर्याद देणारी तिची आई देखील फितूर झाली. मात्र डीएनए चाचणीचा पुरावा ग्राह्य धरीत आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी सुनावली.
अशोक रमेश कदम (वय 29, रा. येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले. सहायक पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार एस. व्ही. चिकणे यांनी मदत केली. 15 मे 2015 आणि त्यापूर्वीच्या सहा महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडला. पीडितेचे कुटुंबीय आजीकडे राहायला गेले होते. त्यावेळी 14 वर्षीय पीडित मुलगी आणि अशोक यांची ओळख झाली होती.
- पुणे: गाडीला दगड मारला म्हणून त्यानं डोक्यातच दगड घातला
फिर्याद देण्याच्या सहा महिन्यापूर्वी पीडित घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती तीन दिवसांनी घरी आली. घरच्यांनी तिच्याकडे याबाबत विचारणा केली असता तिने मैत्रिणीकडे गेल्याचे सांगितले. त्यानंतर दोन महिन्यांनी तिला अशक्तपणा आल्याने डॉक्टरकडे नेण्यात आले. त्यावेळी ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. विश्वासात घेतल्यावर तिने अशोक याने आपल्यावर एका खोलीत वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर आळंदी येथे नेऊन लग्न केल्याचे सांगितले. मात्र पीडिता अल्पवयीन असल्याने लग्न ग्राह्य धरण्यात आले नाही. त्यामुळे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 376 आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण
खटला सुरू असताना पीडित मुलगी आणि तिची आई दोघीही फितूर झाल्या. मात्र वैद्यकीय अधिका-यांची साक्ष, पीडितेच्या गर्भाचा अंश आणि आरोपीचे पालकत्व सिद्द करणारा डीएनए पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यावरून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
- ऍड. शुभांगी देशमुख, विशेष सरकारी वकील
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)