पुणे जि्ल्ह्यात आता या साखर कारखान्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी  

shugarcane
shugarcane

माळेगाव (पुणे) : पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीनंतर आता साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) धनंजय डोईफोडे यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये माळेगाव, नीरा-भीमा, विघ्नहर, संत तुकाराम आणि सोमेश्वर या सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. 

माळेगाव कारखान्याची सुमारे 13 हजार 800 इतकी सभासदसंख्या आहे. मतदारांची प्रारूप मतदार यादी उद्या शुक्रवारी (ता. 6) सकाळी 11 वाजता पुण्यातील साखर संकुलामधील प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) नोटीस बोर्डासह माळेगाव कारखाना कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पाहावयास मिळणार आहे, तसेच सहायक निबंधक सहकारी संस्था (बारामती) व तहसील कार्यालय बारामती या ठिकाणीही प्रसिद्ध होणार आहे. 

संबंधित मतदारांना प्रारूप मतदार यादीवर हरकती व आक्षेप दाखल करण्यासाठी 10 दिवसांची मुदत (16 डिसेंबरपर्यंत) दिली आहे. या हरकती पुण्यातील साखर संकुलामधील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात येऊन नोंदवाव्या लागणार आहेत. तसेच, ई-मेलद्वारेही (rjdpune.election@gmail.com) हरकती नोंदविता येणार आहेत. दाखल हरकती व आक्षेप यांच्यावरील निर्णय 26 डिसेंबरपर्यंत घेतला जाणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 

"सोमेश्‍वर'चे 25 हजार सभासद 
नीरा भीमा कारखान्याची मतदार संख्या 6 हजार सातशे इतकी असून, या मतदारांची प्रारूप मतदार यादी 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. विघ्नहर कारखान्याची सुमारे 19 हजार इतकी मतदार संख्या असून, 3 डिसेंबर रोजी मतदारांची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. संत तुकाराम कारखान्यात सुमारे 21 हजार मतदारसंख्या असून, 4 डिसेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. सोमेश्वर कारखान्याची 19 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, येथील मतदारसंख्या सर्वाधिक 25 हजार इतकी आहे.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com