Agriculture Loan : पुणे : शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी ४१० कोटींचे कर्ज वाटप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी एकूण ४०९ कोटी ६४ लाख ८४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.
Agriculture Loan
Agriculture LoanSakal
Summary

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी एकूण ४०९ कोटी ६४ लाख ८४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी एकूण ४०९ कोटी ६४ लाख ८४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्ज वाटपाचा जिल्ह्यातील ६१ हजार ८१८ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना आणखी येत्या ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे.

यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्ज घेणारे नवीन ३ हजार ७७ शेतकरी वाढले आहेत. दरम्यान कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ६८.४६ टक्के इतके पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेरपर्यंतच्या कर्ज वाटपाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत २७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांचे अधिकचे पीक कर्ज वाटप झाले आहे.

रब्बी हंगामातील पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या महिनाभरात रब्बीसाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत होते. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्र सरकारने व्याज परताव्यावरील सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे. त्यामुळे शून्य टक्के व्याजाची ही योजना गोत्यात आली होती. परंतु राज्य सरकारच्या सुचनेनुसार या अर्धा टक्क्याचा फरकाचा भार उचलण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दर्शविली आहे.

जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने ५९८ कोटी ३५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंतचे आहे. आतापर्यंत यापैकी ६८.४६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रब्बी पीक कर्ज दृष्टीक्षेपात...

  • रब्बीसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट --- ५९८ कोटी ३५ लाख रुपये

  • आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप --- ४०९ कोटी ६४ लाख ८४ हजार रुपये

  • पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी --- ६१ हजार ८१८

  • पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र --- ४८ हजार ४१० हेक्टर

  • गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेरचे वाटप --- ३८२ कोटी २७ लाख ९८ हजार रुपये

  • गेल्यावर्षी तुलनेत यंदा वाटपात झालेली वाढ --- २७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपये

पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण दोन हजार ४०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी खरिपासाठीचे उद्दिष्ट हे १ हजार ८०१ कोटी ६५ हजार रुपयांचे आहे. या पीक कर्ज वाटप उपक्रमांतर्गत मागेल त्या पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जात आहे. कर्जाची मागणी केलेला एकही पात्र शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा बॅक सातत्याने घेत आहे.

- प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com