

Pune Government Land Violations 330 Cases Exposed 112 Plots Face Action as 30 to 40 Sites Worth 350 Crore Seized
sakal
पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात राज्य शासनाकडून कब्जेहक्काने अथवा भाडेतत्त्वावर वाटप करण्यात आलेल्या ११२ जमिनींमध्ये शर्तभंग झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या ३० ते ४० जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन शासनजमा केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जागा या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील असल्याचे समोर आले आहे.