Pune District : ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातून केली २७६ कोटींची विकासकामे

पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मागील तीन वर्षात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून २७६ कोटी ०६ लाख १३ हजार ६४१ रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत.
pay commission
pay commissionsakal
Summary

पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मागील तीन वर्षात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून २७६ कोटी ०६ लाख १३ हजार ६४१ रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मागील तीन वर्षात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून २७६ कोटी ०६ लाख १३ हजार ६४१ रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत. यापैकी पिण्याचे पाणी आणि स्वच्छता यावर १३८ कोटी तीन लाख सहा हजार ८२१ रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंधराव्या वित्त आयोगातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी ४२.६१ टक्के निधी खर्च करण्यात ग्रामपंचायतींना यश आले आहे.

चौदावा वित्त आयोग ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात आला. त्यानंतर राज्यात १ एप्रिल २०२० पासून पंधराव्या वित्त आयोगाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तेव्हापासून ३१ मार्च २०२३ अखेरपर्यंत या आयोगाची अंमलबजावणी सुरु होऊन तीन वर्षे पूर्ण झाली असून, आता १ एप्रिल २०२३ पासून चौथे वर्ष सुरु झाले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (ता.२७) सांगितले.

केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाचा पन्नास टक्के निधी हा फक्त पिण्याचे पाणी, पावसाचे पाणी संकलन, स्वच्छता व हागणदारीमुक्त गावांचा दर्जा कायम राखण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आपापल्या गावांचे पूर्वीचे गाव विकास कृती आराखडे बदलावे लागले होते. हे आराखडे सुधारित तयार करून पुन्हा नव्याने प्लॅन प्लस या प्रणालीत अपलोड करावे लागले होते.

केंद्राकडून वित्त आयोगामार्फत गावांच्या विकासासाठी निधी दिला जातो. त्यानुसार दर पाच वर्षांनी नवा आयोग स्थापन केला जातो आणि या आयोगाच्या शिफारशीनुसार गावांना निधी दिला जातो. यासाठी पहिल्यांदा गावनिहाय गाव विकासाचा पंचवार्षिक कृती आराखडा आणि त्यानंतर दरवर्षी आर्थिक वर्षनिहाय विकास आराखडा तयार करून त्यास ग्रामपंचायतींच्या सभेत आणि ग्रामसभेत मंजुरी घ्यावी लागते. यानुसार हे आराखडे आधीच ग्रामसभांमध्ये मंजूर झालेले आहेत.

जिल्ह्यातील पंचायतराज संस्था

- जिल्हा परिषद --- ०१

- पंचायत समित्या --- १३

- ग्रामपंचायतींची संख्या --- १३८४

- तीन वर्षात प्राप्त झालेला निधी --- ६४७ कोटी ८१ लाख ४८ हजार ८४४ रुपये.

-आतापर्यंत खर्च झालेला एकूण निधी --- २७६ कोटी ०६ लाख १३ हजार ६४१

- अखर्चिक निधी (शिल्लक निधी) --- ३७१ कोटी ७५ लाख ३५ हजार २०३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com