पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अतुल बेनके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांची पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जुन्नर येथे आज बुधवार ता.23 रोजी सत्कार करण्यात आला.

जुन्नर - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांची पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जुन्नर येथे आज बुधवार ता.23 रोजी सत्कार करण्यात आला. दैनिक सकाळचे जेष्ठ पत्रकार दत्ता म्हसकर यांच्या हस्ते बेनके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, नगरसेवक फिरोज पठाण, शहराध्यक्ष धनराज खोत, माजी सभापती बाजीराव ढोले, संतोष ढोबळे, बाळा सदाकाळ, अजिंक्य घोलप, ललित जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मातीवरील कबड्डीला मॅटवर नेण्यासाठी सर्वोत्तपरी मदत केली जाईल. राज्य व देश पातळीवरील कबड्डी खेळाडुसाठी यापुढे अधिकाधीक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ग्रामीण खेळाडूंना राज्य व देश पातळीवर पाठविण्याचे प्रयत्न करण्यात येणार असून महिलांचा कबड्डी संघ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्याचा मानस असून जिल्हा संघटनेत माजी महिला कबड्डीपट्टू यांना प्रथमच स्थान देण्यात आले असल्याचे बेनके यांनी यावेळी सांगितले. यावेळी संतोष ढोबळे यांनी सूत्र संचलन केले तर आभार दिनेश दुबे यांनी मानले.

Web Title: on Pune District Kabaddi Association atul benke selected as vice president