पुण्यातील आरोग्य सेवेच्या अब्रूची लक्तरे वेशीला...

velhe health
velhe health

वेल्हे (पुणे) : तालुक्यातील दुर्गम चांदर गावातील सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेस झोळी करून पायी दोन तासांच्या प्रवासानंतर पानशेत येथे आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र, डाॅक्टर उपलब्ध नसल्याने तिला उपचार मिळण्यात उशीर झाला. या महिलेने यशस्वीपणे मृत्यूला झुंज दिली. मात्र, या प्रकारामुळे पानशेत परिसरातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे. 

पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील वेल्हे तालुक्‍यातील चांदर येथील आदिवासी महिला बारकाबाई लक्ष्मण सांगळे (वय 65) या मंगळवारी (ता. 3) शेतात काम करत होत्या. त्या वेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सापाने त्यांना चावा घेतला. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक चिंतामणी पोळ व गौतम सांगळे यांनी त्यांना झोळीमध्ये घालून दऱ्याखोऱ्यातून पायी चालत उपचारासाठी पानशेत येथे आणले. परंतु, पानशेत येथे उपचारासाठी डॉक्‍टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या महिलेला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खानापूर (ता. हवेली) या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

ससून येथील उपचारानंतर तिचे प्राण वाचले. मात्र, वेल्हे तालुक्‍यातील आरोग्य सेवेचा बोजवारा कसा उडाला आहे, हे त्यामुळे दिसून आहे. चांदर परिसरात सुविधांची वानवा आहे. या परिसरात रस्त्याचा प्रश्‍न गंभीर आहे. आरोग्यसेवा या ठिकाणी पोचत नाहीत. 

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या प्रश्‍नाबाबत जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले, ""या इमारतीसाठी दोन कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे येथील काम रखडले आहे. 
बांधकाम विभाग आणखी किती बळी घेणार?'' 

""पानशेत येथे आरोग्य केंद्रासाठी निधीची तरतूद कमी आहे. येथील जागेचा तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्याने या ठिकाणी काम रखडले आहे,'' अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रफुल्ल तावडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com