पुणे जिल्हा दुध संघ; ११ जागांसाठी रविवारी मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katraj Dairy

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या रविवारी (ता. २०) मतदान होणार आहे.

पुणे जिल्हा दुध संघ; ११ जागांसाठी रविवारी मतदान

पुणे - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ((Pune District Milk Association)) (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Election) येत्या रविवारी (ता. २०) मतदान (Voting) होणार आहे. मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी (ता. २१) मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार असल्याचे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी शुक्रवारी (ता. १८) सांगितले.

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.

कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. या निवडणुकीतील आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, मुळशी या पाच तालुकास्तरीय मतदारसंघात दुरंगी तर, भोर आणि मावळ या दोन तालुकास्तरीय मतदारसंघात तिरंगी लढती होत आहेत.

जिल्ह्यातील बारामती व इंदापूर हे दोन तालुके वगळता उर्वरित अकरा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तालुकास्तरीय मतदारसंघ आहे. या तालुकास्तरीय मतदारसंघाच्या अकरा, महिलांसाठीच्या दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), भटक्या जाती, विमुक्त जमाती (व्ही. जे. एन. टी.) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

मतदान होत असलेले मतदारसंघ

तालुकास्तरीय मतदारसंघ

 • आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, मावळ, मुळशी आणि शिरूर (एकूण सात जागा).

 • महिला राखीव - २ जागा

 • नागरिकांचा मागास प्रवर्ग - १ जागा

 • भटक्या जाती-विमुक्त जमाती प्रवर्ग - १ जागा

मतदारसंघनिहाय उमेदवार

 • आंबेगाव - विष्णू हिंगे विरुद्ध अरुण गिरे

 • खेड - चंद्रशेखर शेटे विरुद्ध अरुण चांभारे

 • जुन्नर - बाळासाहेब खिलारी विरुद्ध देवेंद्र खिलारी

 • मुळशी - रामचंद्र ठोंबरे विरुद्ध कालिदास गोपाळघरे

 • शिरूर - स्वप्नील ढमढेरे विरुद्ध योगेश देशमुख.

 • भोर - दिलीप थोपटे, अशोक थोपटे आणि दीपक भेलके.

 • मावळ - बाळासाहेब नेवाळे, लक्ष्मण ठाकर, सुनंदा कचरे.

महिला राखीव

केशरबाई पवार, लता गोपाळे, रोहिणी थोरात आणि संध्या फापाळे.

ओबीसी मतदारसंघ

 • अरुण गिरे, भाऊ देवाडे, वरुण भुजबळ.

 • विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघ

 • निखिल तांबे, प्रदीप पिंगट.

निवडणुकीतील ठळक बाबी

 • कात्रज डेअरीच्या विद्यमान अध्यक्षांसह पाच संचालक पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात

 • विद्यमान संचालकांऐवजी एका संचालकांचे पती निवडणूक आखाड्यात

 • मुळशीत मामा-भाचा लढत

 • दोन माजी संचालक निवडणूक रिंगणात

 • जिल्हा परिषदेचे दोन माजी पदाधिकारी आणि एक माजी सदस्य रिंगणात

 • झेडपीचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे दोन जागांवर उमेदवार

टॅग्स :puneelectionMilkVoting