पुणे जिल्ह्यात आज २०२ नवे कोरोना रुग्ण; तर २२८ जण कोरोनामुक्त | Corona Patients | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient
पुणे जिल्ह्यात आज २०२ नवे कोरोना रुग्ण; तर २२८ जण कोरोनामुक्त

पुणे जिल्ह्यात आज २०२ नवे कोरोना रुग्ण; तर २२८ जण कोरोनामुक्त

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) २२८ जण मंगळवारी (ता.२१) दिवसभरात कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. याउलट दिवसात २०२ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील ९५ जण आहेत. अन्य एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा मृत्यू जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहे.

दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ५६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३८, नगरपालिका हद्दीत १० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसात ११ हजार ४०९ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८६ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ६४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६२, नगरपालिका हद्दीतील १४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ८२७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी ५६२ रुग्णांवर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुर आहेत. उर्वरित १ हजार २६५ जण गृह विलगीकरणात आहेत. मागील पावणेदोन वर्षापासून आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ६१ हजार ३२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, यापैकी ११ लाख ४० हजार ३०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १९ हजार २२४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona patients