पुणे जिल्हा पोलीस दलातील चाणाक्ष श्वान राणीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील अत्यंत चाणाक्ष श्वान राणीचा वयाच्या चौदाव्यावर्षी रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Rani Dog
Rani DogSakal
Summary

पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील अत्यंत चाणाक्ष श्वान राणीचा वयाच्या चौदाव्यावर्षी रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

लोणी काळभोर - पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील (Pune Police Forcer) अत्यंत चाणाक्ष श्वान राणीचा (Rani Dog) वयाच्या चौदाव्यावर्षी रविवारी (ता.१७) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे.

राणीने पोलीस दलात २००८ ते २०१७ पर्यंत तब्बल दहा वर्षे सेवा केली. तिचा सांभाळ पोलीस हवालदार गणेश फापाळे करीत होते. तिने या सेवेमध्ये अनेक गुन्हे गंभीर उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये खेड येथील खून, चाकण मधील शेल पिंपळगा खून प्रकरण, जेजुरी मधील अल्पवयीन मुलीचा खून व बलात्कार, भिगवण येथील अल्पवयीन मुलाचा खून , भांबुर्डी येथील चिंकारा प्रकरण, आणि दरोडा घरफोडी अशा अनेक महत्त्वाच्या गुन्हे उघडकीस आणले. तसेच सदर गुन्ह्यामध्ये साक्ष देऊन आरोपींना जन्मठेप लागलेली आहे.

दरम्यान, राणीच्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तिचे व पोलीस हवालदार गणेश फापाळे यांचे कौतुक केले.

श्वान राणी २०१७ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर तिचा सांभाळ पोलीस हवालदार गणेश फापाळे करीत होते. फापाळे कुटुंबाने तिचा घरातील सदस्याप्रमाणे तब्बल ४ वर्ष सांभाळ केला. परंतु, राणीच्या जाण्याने फापाळे कुटुंबाचे दुःख अनावर झाले आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने राणीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सुद्धा राणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com