Sanctuary
Sanctuary

पुणे जिल्ह्यात आहेत एवढी काळवीटं, लांडगे अन् बिबटे!

पुणे - बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुणे परिसरातील अभयारण्यात झालेल्या वन्यप्राण्यांच्या प्रगणनेत दोन हजार ५०० प्राण्यांची नोंद झाल्याचा अहवाल वन खात्याने तयार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०० प्राणी जास्त दिसल्याचेही निरीक्षण खात्याने नोंदविले आहे.

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन विभाग अभयारण्यातील पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी करते. त्या रात्रभरात कोणत्या प्रकारचे किती प्राणी पाणवठ्यावर येतात, त्याच्या नोंदी वन कर्मचारी करतात. ही वन्य प्राण्याची प्रत्यक्ष गणना नसते. यातून कोणते प्राणी जंगलात आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी या प्रगणतनेची पद्धत वापरली जाते. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, मयूरेश्‍वर, रेहेकुरी आणि माळढोक अभयारण्यामध्ये ही प्रगणना झाली. परिसरातील चार अभयारण्यामधील १७० पैकी ५० पाणवठ्यांवर ही प्रगणना करण्यात आली. त्यात दोन हजार ५०० प्राणी दिसल्याची माहिती वन खात्यातर्फे देण्यात आली. यात दुर्मीळ वन्यप्राण्यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com