Corona update : पुणे जिल्हातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ; तर ४ रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

पुणे जिल्हातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ; तर ४ रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ६१ ने वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा २ हजार ९९ झाली आहे. मंगळवारी हीच संख्या २ हजार ३८ इतकी होती. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत दिवसात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १९२ जण कोरोनामुक्त झाले असून याउलट दिवसभरात २५७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी दोन मृत्यूचा समावेश आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्राच्या हद्दीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

हेही वाचा: 'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

दिवसभरात आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक १०६ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८३, नगरपालिका हद्दीत २१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात चार नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ६९, पिंपरी चिंचवडमधील ४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५८, नगरपालिका हद्दीतील ११ आणि आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९ जणांचा समावेश आहे. सद्यःस्थितीतील एकूण २ हजार ९९ सक्रिय कोरोना रुग्णांपैकी १ हजार २८ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू असून, उर्वरित १ हजार ७१ जण गृह विलगीकरणात आहेत.

loading image
go to top