esakal | पुणे जिल्ह्याला गुरुवारी 7,000 रेमडीसिव्हीर मिळणार; बुधवारी 2,366 उपलब्ध

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्याला गुरुवारी 7,000 रेमडीसिव्हीर मिळणार; बुधवारी 2,366 उपलब्ध
पुणे जिल्ह्याला गुरुवारी 7,000 रेमडीसिव्हीर मिळणार; बुधवारी 2,366 उपलब्ध
sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी बुधवारी रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा साठा तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध झाला. बुधवारी दोन हजार 366 रेमडीसिव्हीर प्राप्त झाले आहेत. मात्र, गुरुवारी सुमारे सात हजार रेमडीसिव्हीर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालयांची संख्या सुमारे सहाशेच्या जवळपास पोचली आहे. तसेच, सुमारे साडे पंधरा हजार ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. या बेड्सच्या क्षमतेच्या तुलनेत रुग्णालयांना रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रेमडेसिव्हीरचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरी भागात सहा भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट आणि वितरक यांच्याकडील रेमडेसिव्हीरची उपलब्धता आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in/corona-virus-updates या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा: अदर पुनावालांच्या जीविताला धोका? Y सिक्यूरिटी देण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय

जिल्हा प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांनाच रेमडेसिव्हीर :

महापालिकेच्या रुग्णालयांसह इतर सरकारी रुग्णालयांना शासकीय स्तरावरून रेमडेसिव्हीर उपलब्ध होत आहेत. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून केवळ खासगी रुग्णालयांनाच त्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तथापि जिल्हा प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच ससून रुग्णालयास सुमारे चार हजार रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.