Malnutrition Relief : पुणे जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे

पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सशक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रांचा कुपोषणमुक्तीसाठी मोठा आधार मिळू लागला आहे.
Malnutrition
Malnutritionsakal

पुणे - पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सशक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रांचा कुपोषणमुक्तीसाठी मोठा आधार मिळू लागला आहे. या केंद्रांमुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील सुमारे ९००हून अधिक बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. परिणामी जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या आता ही पूर्वीच्या तुलनेत दहा टक्क्यांच्या आत आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हा आरोग्य विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी) सुरू करण्यात आली आहेत. कुपोषित बालकांना या केंद्रांमध्ये दाखल करून त्यांना पोषक आहार आणि आवश्‍यक गोळ्या-औषधे दिली जात आहेत. शिवाय या केंद्रांमध्ये दाखल केलेली बालके ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवली जात असून त्यांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे.

सध्या जिल्ह्यात केवळ २५० कुपोषित बालके आहेत. या बालकांनाही कुपोषणमुक्त करण्यासाठी आता ग्राम बाल विकास केंद्रांत दाखल करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात २८८ ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

या केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या अतितीव्र कुपोषित(सॅम) आणि तीव्र कुपोषित (मॅम) बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना या केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये या बालकांच्या तपासणीसाठी खास आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

कोरोनात प्रमाण दुप्पट

कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या (सॅम व मॅमसह) दोन हजारांहून अधिक झाली होती. साधारणतः जिल्ह्यात वर्षभरात एक हजारांच्या आसपास कुपोषित बालकांची संख्या असते. ही संख्या दोन हजारांहून अधिक झाल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण दुप्पट झाले होते. जानेवारी २०२२ मध्ये कुपोषित बालकांची संख्या २ हजार ९६ वर गेली होती.

तत्पूर्वीची सहा महिने अगोदर म्हणजेच जूलै २०२१ मध्ये हीच संख्या केवळ ६६० इतकी होती. जानेवारी २०२२ मध्ये एकूण कुपोषित बालकांमध्ये ४०४ बालके ही अतितीव्र कुपोषित (सॅम) तर, एक हजार ६९२ बालके ही तीव्र कुपोषित (मॅम) असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने केलेल्या सर्वेक्षणातून‌ स्पष्ट झाले होते.

विशेष मोहीम

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कुपोषित बालकांचा शोध घेणे, कुपोषणाची कारणे शोधणे, या बालकांना सकस आहार देणे आणि योग्य औषधोपचार करता यावेत, यासाठी गाव पातळीवर ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन केली आहेत.

कुपोषणस्थिती दृष्टिक्षेपात...

  • जानेवारी २०२२ मधील एकूण कुपोषित बालके : २०९६

  • जून २०२२ मध्ये कुपोषणमुक्त झालेली बालके : ९०४

  • जून २०२२ मधील कुपोषितांची संख्या : ११९२

  • जून २०२३ अखेरपर्यंत कुपोषणमुक्त झालेले : ९०० हून अधिक

  • सध्या जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या : २५०

  • एकूण ३५० पैकी अतितीव्र (सॅम) कुपोषितांची संख्या : ३०

  • तीव्र कुपोषित (मॅम) एकूण बालके : २२०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com