Pune Traffic Alert
esakal
Dive Ghat traffic on Pune–Saswad–Jejuri route will remain closed for 3 hours : हडपसर ते दिवे घाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम सुरु आहे. या कामामुळे गुरुवारी (५ फेब्रुवारी ) रोजी दिवे घाटातील वाहतूक ३ तास बंद राहणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. या वेळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.