पुणे विभागातील पंचवीस उपजिल्‍हाधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

उपजिल्हाधिकारी कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण
हेमंत निकम (उपविभागीय अधिकारी सोलापूर), दादासाहेब कांबळे (उपविभागीय अधिकारी बारामती), संजय शिंदे (विशेष भूसंपादन अधिकारी पुणे), सचिन इथापे (उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे), हिम्मत खराडे (नोंदणी महानिरिक्षक कार्यालय), अश्‍विनी जिरंगे (उपजिल्हाधिकारी नागरी समूह पुणे), दत्तात्रेय कवितके (रोजगार हमी योजना सांगली).

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातील २५ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका ठाकूर यांची साताऱ्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी, तर त्यांच्या जागी मृणालिनी सावंत यांची नियुक्ती केली आहे. 

पुणे शहर प्रांत भाऊ गलांडे यांची कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली असून त्यांच्या जागी संतोषकुमार देशमुख यांची नियुक्ती केली आहे. नोंदणी महानिरीक्षक सोनप्पा यमगर यांची पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. एकाच पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांना तत्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जे अधिकारी विधानसभा निवडणुकीचे निवडणुकीचे निर्णय अधिकाऱ्यांना ९ ते ११ या दरम्यान यशदा येथे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्‍यक आहे, असे आदेशात नमूद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Division 25 Deputy Collector Transfer